Ad will apear here
Next
जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित्त रविवारी वृक्षारोपण
पुणे : दि इंडियन इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया आणि वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (डब्ल्यूआयसीएएसए) यांच्यातर्फे जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित्त रविवारी,१५ जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत अॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एआरएआय) टेकडीवरील भांबुर्डा वन परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी या उपक्रमाला उत्तम  प्रतिसाद मिळाला होता. जागतिक फळबिया लागवड दिवसानिमित्त १५ जुलै रोजी ५५ हजार ५५५ फळबिया लावण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात मात्र एक लाख तीन हजारपेक्षा अधिक फळबियांची लागवड झाली. यंदाही पर्यावरण संवर्धनात भरीव योगदान देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून सीए व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. आयसीएआयच्या  पुणे विभागात सात हजार २०० सीए आणि २२ हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सभासद आहेत. 

‘या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनात योगदान द्यावे’, असे आवाहन आयसीएआय पुणे विभागाचे चेअरमन सीए आनंद जाखोटिया आणि आयसीएआयच्या डब्ल्यूआयसीएएसएच्या पुणे विभागाचे चेअरमन सीए राजेश अगरवाल यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZSVBQ
Similar Posts
‘एआरएआय’ आणि ‘एनसीएल’मध्ये सामंजस्य करार पुणे : इलेक्ट्रिक मोबिलिटी असलेल्या वाहनांची संख्या वाढविणे ही आज काळाची गरज आहे. भविष्यात या इलेक्ट्रिक गाड्यांमधील बॅटरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगासाठी लागणाऱ्या योग्य बॅटरी विकसित करत त्याचे एकत्रित संशोधन गतिमान करण्याच्या उद्देशाने दी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ
‘वाहन उद्योगाच्या हिताला बाधा आणणार नाही’ पुणे : ‘केंद्र सरकार आपली उद्योगविषयक धोरणे ठरवताना देशातील वाहन उद्योगाच्या हिताला बाधा येणार नाही याची खबरदारी घेईल,’ असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिले. ‘सिम्पोझिअम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी २०१९’ या वाहन तंत्रज्ञान विषयक जागतिक परिषदेच्या समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते
‘पर्यायी इंधनांवर आधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल गरजेची’ पुणे : ‘पेट्रोल आणि डिझेल या खर्चिक आणि प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल यांसारख्या पर्यायी इंधनांवर प्रगत व्हावी यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच पुण्यात केले
‘एआरएआय’मध्ये पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा पुणे: ‘दि ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडिया’च्या (एआरएआय) नवीन पर्यावरण संशोधन प्रयोगशाळा व ‘व्हर्च्युअल कॅलिब्रेशन सेंटर’चे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language